
सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीगमध्ये प्राईड ऑफ पालघर इलेव्हन क्रिकेट क्लबने सिंबा सिक्सर्स क्रिकेट क्लबचा 8 धावांनी पराभव केला. चंदन दळवीचे (37 चेंडूंत 67 धावा) शानदार झटपट त्यांच्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
मुंबई पोलीस जिमखाना येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत बुधवारी प्राईड ऑफ पालघर इलेव्हन सीसीचे 163 धावांचे आव्हान सिंबा सिक्सर्स सीसी संघाला पेलवले नाही. सौरभ ठाकूर (37), अक्षय वैद्य (36), हृषीकेश पाटील (28) आणि आर्या राऊतने (26) चांगला प्रतिकार केला तरी त्यांना 20 षटकांत 8 बाद 154 धावाच करता आल्या.
तत्पूर्वी, सिंबा सिक्सर्सने नाणेफेक जिंकून प्राईड ऑफ पालघर इलेव्हन सीसी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चंदन दळवीच्या फटकेबाजीच्या जोरावर 20 षटकांत 5 बाद 162 धावांची मजल मारली. त्याने 37 चेंडूंत 4 चौकार आणि 6 षटकारांसह 67 धावा फटकावल्या. ध्रुव राऊतने 37 आणि हर्षद देसलेने 31 धावा करत त्याला चांगली साथ दिली.
अन्य सामन्यात, इन्स्पायर्ड रॉयल्सने सूर्यवंशी वॉरियर्स सीसीवर 9 विकेट राखून मात केली. सूर्यवंशी वॉरियर्सचा डाव 19.3 षटकांत 127 धावांवर आटोपला. इन्स्पायर्ड रॉयल्सने प्रतिस्पर्धी संघाचे माफक आव्हान 16.3 षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले.
संक्षिप्त धावफलक
प्राईड ऑफ पालघर इलेव्हन सीसी – 20 षटकांत 5 बाद 162 (चंदन दळवी 67 (37 चेंडू, र्4s4, र्6s6), ध्रुव राऊत 37, हर्षद देसले 31; हार्दिक पाटील 2/33) वि. सिंबा सिक्सर्स सीसी – 20 षटकांत 8 बाद 154 (सौरभ ठाकूर 37, अक्षय वैद्य 36, हृषीकेश पाटील 28, आर्या राऊत 26, हर्षद देसले 2/35).
सूर्यवंशी वॉरियर्स सीसी – 19.3 षटकांत सर्वबाद 127 (कबीर कोरे 30, मकरंद राऊत 24, नवनीत एस. 23; पार्थ घरत 3/26, प्रीतेश ठाकूर 2/11) वि. इन्स्पायर्ड रॉयल्स सीसी – 16.3 षटकांत 1 बाद 128 (प्रणेश धुरू 54, ध्रुव साने 43ङ, केदार राऊत 20ङ). निकाल ः इन्स्पायर्ड
रॉयल्स 9 विकेट राखून विजयी.


























































