अयोध्येतील राम मंदिरात पुजारी पदांसाठी भरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिरात नवीन पुजाऱयांची भरती केली जाणार आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पुजारी पदांसाठी एक नोटिफिकेशन जारी केले आहे. मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा आधी ट्रस्टने इच्छुकांकडून अर्ज मागवले असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2023 आहे. गुरुकुल शिक्षा आणि रामानंदीय परंपरामधून दीक्षा घेतलेल्या व्यक्तींनाच या पदासाठी अर्ज करता येणार आहे.