
पंतप्रधान ई-बस सेवेला आज केंद्र सरकारने मंजुरी दिली. 100 शहरांत या ई-बस धावतील. देशात 10 हजार नवीन इलेक्ट्रिक बस चालवण्यात येतील, अशी माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी दिली. पीएम ई-बस सेवा योजनेवर 57 हजार 613 कोटी रुपये खर्च केले जातील.























































