
चंद्रपूर येथे कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला. कैद्याला पोलिसाचा राग आल्यानंतर त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसालाच बदडले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून पोलिसाला सोडवलं. या घटनेचा व्हिडीओ समाज माध्यमात व्हायरल झाला आहे.
चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून एक कैदी आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. मंगळवारी ( 16 मे ) कैद्याची प्रकृती खालावली होती. पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात नेले त्याला कैद्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलून आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये तो पोलिसांना शिवीगाळ करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही असं दिसंत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी पोलिसाचा बचाव करताना दिसत आहेत.
चंद्रपूर येथे कैद्याकडून पोलिसाला झाडूने मारहाण, व्हायरल व्हिडीओनं उडाली खळबळ pic.twitter.com/JildZp0V9E
— Saamana (@SaamanaOnline) May 22, 2023






















































