कारागृहे हाऊसफुल! क्षमतेपेक्षा जास्त कैदी

देशातील कारागृहांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैदी असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने आज राज्यसभेत दिली. डिसेंबर 2019 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशभरात1350 कारागृहे आहेत. या कारागृहांमध्ये सुमारे 4 लाख 78 हजार 600 कैदी आहेत. वास्तविक या कारागृहांची कमाल क्षमता 4 लाख 3 हजार 739 एकढीच आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री किशन रेड्डी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात देशभरातील कारागृहांमध्ये किती कैदी आहेत, याची माहिती दिली. याबाबतचा प्रश्न खासदार ज्योतिरादित्य सिंदिया यांनी विचारला होता. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कारागृहांत असलेल्या कैद्यांची आकडेवारी संकलित केलेली आहे. एनसीआरबीच्या 2019 सालच्या अहवालावर आधारित माहिती किशन रेड्डी यांनी दिली. त्यामध्येही पश्चिम बंगालमधील कैद्यांची संख्या ही एनसीआरबीच्या 2017 सालच्या अहवालावर आधारित असल्याचे सांगितले.

तुरुंगात क्षमेतपेक्षा जास्त कैदी असल्याप्रकरणी अद्याप राज्यांना कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत. मात्र यासंदर्भात तसेच तुरुगांची परिस्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अॅडव्हायजरी जारी करण्यात आलेली आहे. तसेच त्यांना ‘मॉडेल प्रिझन मॅन्युअल 2016’ देण्यात आल्याचे गृहमंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या