
अमेरिकेने धडक कारवाई करत व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना पत्नीसह उचलून अमेरिकेत आणले. यानंतर आता मादुरोंप्रमाणे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अपहरण करतील का, असा प्रश्न काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर लादलेल्या 50 टक्के टॅरिफवरून मोदी सरकारला धारेवर धरले. त्याबाबत बोलताना व्हेनेझुएलाचा संदर्भ देऊन ते म्हणाले की, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शुल्क लावल्यानंतर अमेरिकेसोबत व्यापार करणे अशक्य आहे. अमेरिकेत हिंदुस्थानची निर्यात रोखण्यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हिंदुस्थानला आता पर्यायी बाजारपेठा शोधाव्या लागतील. आता प्रश्न हा आहे, पुढे काय? व्हेनेझुएलासारखी स्थिती हिंदुस्थानातही होणार? ट्रम्प हिंदुस्थानच्या पंतप्रधानांचे अपहरण करतील? विधानावरून वाद वाढल्यानंतर चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. ट्रम्प ज्या पद्धतीने वागत आहेत अशाने संयुक्त राष्ट्रांची व्यवस्था उद्ध्वस्त होईल. ट्रम्प यांनी मोदींना धमकी दिली, त्यावरून आपल्याला सतर्क राहावे लागेल, असे चव्हाण म्हणाले.



























































