बसच्या टपावरचा प्रवास जीवावर बेतला, एक ठार दोन जखमी

440
death

बसच्या टपावर बसून प्रवास करणे धोक्याचे असून हरियाणा येथे तीन विद्यार्थ्यांना हा प्रवास महागात पडला. ही घटना बिचपडी या ठिकाणी घडली.

खासगी बसच्या टपावरून प्रवास करणारे तीन विद्यार्थी बिचपडी रोड वरील बोगद्याला धडकले. या घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला आणि दोन मुले जखमी झाले. उपचारासाठी जखमी विद्यार्थांना खानपूर गावातील रुग्णालयात दाखल केले गेले. दरम्यान, या घटनेसंदर्भात पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरुण, सूरज, अकिंत आपआपल्या गावातून कोचिंग क्लासेस घायला गोहाना शहरात जाण्यासाठी खासगी बसच्या टपावर बसलेले होते. बस चालकाने जींद रोड वर बाजार मंडी समोर असलेली वाहतुक कोंडी टाळण्यासाठी बिचपडी ते महमूदपुर च्या दिशेने बस नेली. दोन गावांच्या मध्ये सोनीपत-गोहाना-जींद रेल्वे मार्गावर एक बोगदा आहे. ह्या बोगद्याचे टोक उंच असल्याने तेथे मोठी वाहने जाऊ जात शकत नाही.

या बसच्या टपा वर बरेच विद्यार्थी बसले होते. अरुण, सूरज व अंकित हे तिघे जण मागच्या बाजूला उलट्या दिशेने बसले होते.आणि इतर मुले समोरच्या दिशेने तोंड करून बसले होते.जेव्हा बस बोगद्याच्या जवळ आली,तेव्हा इतर मुले झोपून गेली. परंतु ह्या तीन मुलांना बोगदा कधी जवळ आला ह्याचे भान राहीले नाही. तिन्ही विद्यार्थी बोगद्यावर धडकले.

अरुण ला डोक्यावर आणि कमरेवर जास्त मार लागाला.व दोघे जण जखमी झाले. खानपुर येथील रुग्णालयात तीघांना दाखल केले. तेथील डॉक्टरांनी अरुणला मृत घोषित केले. बस चालकाच्या निष्काळजीपणा मुळे ही घटना घडली. ही घटना पोलिंसाना सांगण्यात आली. अरुणच्या कुटुंबाच्या विधानावरुन पोलिसांनी बस चालकावर गुन्हा दाखल केला.

 

आपली प्रतिक्रिया द्या