शाळांच्या मनमानी शुल्कवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा करा!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

कोरोना कालावधीमध्ये अनेक कुटुंबावर आर्थिक संकट असून पालकांना मुलांना शिक्षण देण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शाळांना मनमानी शुल्कवाढ करण्यापासून रोखण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी शिवसेनेने विधान परिषदेत केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जगभरात आर्थिक मंदी आली असून त्यामुळे लाखो नोकऱयांमध्ये कपात झाली असून अनेक उद्योग बंद पडले. देशातही अनेकांच्या नोकऱया गेल्या. अनेक कुटुंबासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळांना मनमानी शुल्कवाढ करण्यापासून रोखावे, अशी मागणी राज्यातील पालक वर्गाने महाविकास आघाडी सरकारकडे केली होती. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून सरकारने शाळांनी या वर्षी शैक्षणिक शुल्कवाढ करू नये अथवा शुल्क सुलभ हप्त्यामध्ये घेण्यात यावे, असे आदेश शासन निर्णयान्वये खासगी विनाअनुदानित शाळांना दिले होते.

राज्य शासनाच्या या निर्णयाला राज्यातील शिक्षण संस्थांनी विविध याचिकांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शाळांच्या प्रवेश प्रक्रिया, शुल्क रचना, कर्मचारी व शिक्षकांचे प्रश्न, न्यायालय निकाल व तज्ञांची मते या सर्वांचा विचार करून अस्तित्वात असलेले कायदे बदलण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात शालेय शिक्षणासंदर्भात नवीन कायदा करून सर्व शाळांना किमान व कमाल शुल्क मर्यादा निश्चित करून याबाबत सकारात्मक कार्यवाही करून पालकांना दिलासा द्यावा, अशी मागणी विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.