
मुंबईतील महापालिका कर्मचाऱयांच्या धर्तीवर खासगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित शाळांतील कर्मचाऱयांनाही बालसंगोपन रजा देण्याचा विचार सुरू असून याबाबतचा निर्णय शिक्षण समितीच्या सोमवारी होणाऱया बैठकीत घेण्याची शक्यता आहे. हा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला असल्यामुळे पालिका याबाबत पूर्णपणे सकारात्मक आहे. त्यामुळे यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती पालिका अधिकाऱयाने दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील कर्मचाऱयांना 2019 पासून 180 दिवसांची बालसंगोपन रजा पालिका प्रशासनाने मंजूर केली आहे. त्याच धर्तीवर बालसंगोपन रजेचा लाभ मुंबईतील खासगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित शाळांमधील कर्मचाऱयांना देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे.
त्यानुसार खासगी प्राथमिक अनुदानित/विनाअनुदानित शाळेतील महिला कर्मचारी आणि पत्नी नसलेल्या पुरुष कर्मचाऱयाला किंवा ज्या कर्मचाऱयाची पत्नी असाध्य आजाराने अंथरुणाला खिळलेली आहे अशा कर्मचाऱयांनादेखील 180 दिवसांच्या कमाल मर्यादेत बाल संगोपन रजा मंजूर करण्यात येणार आहे.
- मुलाचे वय 18 वर्षे होईपर्यंतच ही रजा लागू राहणार आहे.
- एका वर्षामध्ये दोन महिन्यांच्या कमाल मर्यादेत ही रजा घेता येईल.
- पहिल्या दोन मुलांसाठी ही रजा घेता येणार आहे.
- नोकरीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर ही रजा मंजूर करता येईल.
- अर्जित रजा आणि अर्धवेतनी रजा तसेच प्रसूती रजेला जोडून ही रजा कर्मचाऱयाला घेता येईल.
- बालसंगोपन रजेवेळी कर्मचाऱयाला मूळ वेतन सुरू राहील.























































