एका पोस्टसाठी आठ लाख रुपये घेणाऱ्या प्रिया वॉरियरने डिलीट केले इंस्टाग्राम अकाऊंट

5405

‘ओरु अदार लव्ह’ मधील एका व्हिडीओत भुवया उंचावून आपल्या नजरेच्या बाणांनी सगळ्यांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया वॉरियर रातोरात सोशल मीडियावर स्टार बनली होती. आता मात्र तिने आपले इंस्टाग्राम अकाऊंट डिलीट केल्याची माहिती आहे.

ट्रोलिंगच्या त्रासाला कंटाळून तिने आपले अकाऊंट डिटेक्टिव्हेट केल्याचे म्हटले जात आहे. परंतु प्रियाला सोशल मीडियावरून ब्रेक घ्यायचा आहे. त्यामुळे तिने अकाऊंट बंद केले असून काही दिवसांनंतर ती पुन्हा सक्रिय होईल, अशी माहिती तिच्या जवळच्या माणसांनी दिली आहे. इंस्टाग्रामवर प्रियाचे 7.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. एका ब्रँडच्या प्रमोशनसाठी ती 8 लाख रुपये मानधन आकारायची. प्रिया टिक टॉकवर अॅक्टीव असून नुकताच तिने ठेका धरतानाचा एक व्हिडिओ शेयर केला होता. हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस उतरला होता.

आपली प्रतिक्रिया द्या