
एकेकाळी बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ अशी ओळख असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता ग्लोबल स्टार झाली आहे. क्वांटिकोमुळे तिला जगभरात ओळख मिळाली आहे. केवळ चित्रपट, जाहिरातीच नाही तर सोशल मीडियातून देखील ती बक्कळ कमाई करतेय. इन्स्टाग्रामवर प्रियांकाचे 54 दशलक्ष फॉलोअर्स असून एका पोस्टसाठी ती चक्क 2 कोटी 16 लाख रुपये आकारत असल्याचे समोर आले आहे.
होपर एचक्यूने जारी केलेल्या रिचलिस्ट 2020 मध्ये हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली 26 व्या क्रमांकावर तर अभिनेत्री प्रियांका चोप्रा 28 व्या क्रमांकावर आहे. महत्वाचे म्हणजे टॉप 100 मध्ये हिंदुस्थानच्या या दोनच सेलिब्रेटींचा समावेश आहे.
26 व्या क्रमांकावर असलेला विराट एका पोस्टसाठी 1 कोटी 35 लाख रुपये मानधन आकारतो, तर प्रियांका चोप्रा 2 कोटी 16 लाख रुपये मानधन आकारते. गतवर्षी याच यादीत विराट कोहली 23 व्या तर प्रियांका चोप्रा 19 व्या स्थानावर होती.


























































