साडी नेसूनही पाठ उघडी, प्रियांकाच्या हॉट फोटोशूटवर नेटकरी नाराज

priyanka-hot-photo shoot

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा विविध कारणांनी कायम चर्चेत असते. आता तिने साडी नेसून हॉट फोटोशूट केल्यानं ती चर्चेत आली आहे. प्रियांकाने डिझायनर साडी तिने नेसली असली तरी संपूर्ण पाठ उघडी दाखवत तिने फोटोशूट केल्याने नेटकऱ्यांनी तिला देशाची संस्कृती विसरली का असं म्हणत ट्रोल केलं आहे.

प्रियांका आपल्या हॉट लूकसाठी प्रसिद्ध आहे. तिने केलेली फॅशन नेहमीच चर्चेचा भाग राहिली आहे. तिने नुकतेच ‘इनस्टाइल’ मासिकासाठी हॉट फोटोशूट केले आहे. मासिकावर तिचा साडीतील फोटो छापण्यात आला आहे. मात्र यामध्ये तिची पाठ संपूर्ण उघडी दिसत आहे. साडीसोबत ब्लाऊज न घातल्याने नेटकरी संतापले. परदेशी अभिनेत्याशी लग्न केल्यानंतर आपली संस्कृती तू विसरली का? अशा आशयाचे प्रश्न नेटकऱ्यांनी प्रियांकाला केले आहेत. एकाने तर लिहिले आहे की, श्रीमंतानी कपडे नाही घातले तर ती फॅशन आणि गरीबांनी कपडे नाही घातले तर ते बेशरम. तर तू परदेशी दिसण्याचा प्रयत्न करत आहेस का, असंही म्हटलं आहे. मात्र त्याचवेळी काही नेटकऱ्यांनी तिची ‘पाठराखण’ केली आहे.

priyanka-photoshoot-reactio

मेट गालातला अवतार

priyanka-met-gala

दरम्यान, गेल्या महिन्यातच मेट गाला या फॅशन इव्हेंटच्या रेड कार्पेट सोहळ्याला प्रियंकाने पती निक जोनससह हजेरी लावली. यंदाच्या मेट गाला सोहळ्याची थीम Camp: Notes on Fashion अशी ठेवण्यात आली होती. यामध्ये प्रियांकाने केलेला अवतार पाहून लोकांनी तिला चांगलेच ट्रोल केले होते.