बंगला 1 ऑगस्टला रिकामा करणार

748

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी प्रियंकाच्या बंगल्यासाठी काँग्रेसच्या वजनदार नेत्याने आपल्याकडे रदबदली केली होती असा दावा ट्विटरवर केला. त्यानंतर लगेचच प्रियंका वढेरा यांनी सरकारने सोडलेल्या फर्मानानुसार 1 ऑगस्टपर्यंत बंगला रिकामा करणार आहे. बंगल्यासाठी कोणाकडेही रदबदली केली नाही, वा आपल्यावतीनेही कोणी बोलले नसल्याचा पलटवार करून पुरी यांच्या ट्विटमधील हवा काढून घेतली.

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका वढेरा यांना लोधी रोडवर सरकारी बंगला देण्यात आला आहे. हा बंगला 1 ऑगस्टर्पंत रिकामा करण्यात यावा असे फर्मान केंद्र सरकारने सोडले आहे. केंद्र सरकारकडून नोटीस आल्यानंतर प्रियंका यांनी तातडीने लखनौला घर हलवण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयावरून चौफेर टीका होत असतानाच हरदीप पुरी यांनी काँग्रेसमधील एका वजनदार नेत्याने आपल्याला फोन करून प्रियंकांच्या बंगल्यासाठी रदबदली केल्याचा दावा केला.

वेंâद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्या ट्विटवर प्रियंका गांधी यांनी लगेचच पलटवार केला. बंगला सोडण्यासाठी आपण मुदत वाढवून मागितलेली नाही. 1 ऑगस्ट रोजीच बंगला रिकामा करणार आहे. यासंदर्भात आपल्यावतीने कुणी बोलले नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.

आपली प्रतिक्रिया द्या