
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
मेट गाला फेस्टमध्ये हटके ड्रेस घातल्याने चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोपडा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिची ही चर्चा कान्स फेस्टीवलमध्ये तिने घातलेल्या हाय स्लिट गाऊन बरोबरच तिच्याकडे गुड न्यूज असल्याचीही आहे. प्रियांकाची मैत्रीण आणि अमेरिकन अभिनेत्री ओक्टाविया स्पेन्सर हीने प्रियांकाच्या एका इन्टाग्राम पोस्टवर Stunning Mamacita.असे लिहले. ज्याचा इंग्रजीत अर्थ होतो. ‘hot momma’. ओक्टावियाची ही पोस्ट प्रियांका मॉमी होणार असल्याचे संकेत देत असल्याने प्रियांका आई होणार आहे अशी चर्चा आता रंगली आहे.

एका हिंदी वृत्तवाहीनीने याबदद्ल वृत्त दिले आहे. प्रियांकाने मेट गाला प्रमाणेच गुरुवारी कान्समध्येही आपल्या हटके लूककडे सगळ्यांची नजर वेधली होती. हाय स्लिट गाऊनमध्ये प्रियांका खूपच छान दिसत होती. पण त्याचवेळी तिचे बेबी बंपही दिसत असल्याची कुणकुण कान्समधील महिला वर्तृळात सुरू झाली. त्यातच ओक्टावियाने प्रियांकाच्या फोटोवर दिलेली प्रतिक्रीयाही तेच सांगत होती. यामुळे प्रियांका-निक आई बाबा होणार अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, प्रियांकाप्रमाणेच निकलाही लहान मुलांची आवड असल्याने त्यांचे चाहते ही गुड न्यूज ऐकण्यासाठी उत्सुक आहेत. पण अजून तरी प्रियांका किंवा निकने यावर प्रतिक्रीया दिलेली नाही. यामुळे प्रियांकाकडे गुड न्यूज आहे की फेक न्यूज हे इतक्यात सांगणे कठीण आहे.




























































