प्रियांकाला आली मुंबईची आठवण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून मुंबईची आठवण येत असल्याचे सांगितले आहे. प्रियांका सध्या न्यूयॉर्कमध्ये राहते. तिने इन्स्टाग्रामवर नाश्ताच्या प्लेटचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिची प्लेट हिंदुस्थानी खाद्यपदार्थांनी भरलेली दिसत आहे. तिने नाश्त्यासाठी कांदेपोहे मागवल्याचे दिसत आहे. पोह्यांनी मुंबईची आठवण दिल्याची पोस्ट प्रियांकाने लिहिली. न्यूयॉर्कमध्ये तिचे ‘सोना’ नावाचे स्वतःचे रेस्टॉरंटदेखील आहे. तिथे ती अनेकदा हिंदुस्थानी पदार्थांचा आस्वाद घेत असते. तिच्या रेस्टॉरंटमध्ये पाणीपुरी ते वडापाव, डोसा, समोसा, कुलचा असे पदार्थ मेन्यूमध्ये आहेत. हॉलीवूड गाजवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस यांनी अलीकडेच सरोगसीच्या माध्यमातून आई-बाबा झाल्याची गुडन्यूज नुकतीच दिली आहे.