स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पवई पोलिसांनी पर्दाफाश केला. पवई येथील एका सोसायटीत स्पा आहे. त्या स्पामध्ये मसाजच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीनंतर पोलिसांनी तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याची शहानिशा करत छापा टाकून पोलिसांनी स्पाचा मॅनेजरला ताब्यात घेतले आणि एका महिलेची सुटका केली. तिची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.