
योगेश पाटील । हिंगोली
सेनगाव तालुक्यातील वरडा पिंप्री गावातील तीन पैकी दोन शिक्षकांची बदली झाली. गुरूजींची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी वरडा पिंप्री ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद अर्थात मिनी मंत्रालयात सीईओच्या दालनातच चिमुकल्यांची शाळा भरविली.
वरडा पिंप्री गावात इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत अध्यापणासाठी तीन शिक्षक कार्यरत असुन, यातील रूस्तुम आळणे व बालाजी तारे या दोन शिक्षकांची बदली करण्यात आली. पर्यायी शिक्षक दिला नसल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक गैरसोय होणार असल्याने संतप्त पालकांनी शिक्षकांची बदली रद्द करा अन्यथा एकही विद्यार्थी शाळेत पाठविणार नाही असा पावित्रा घेतला. यात आज शाळेच्या सुट्टीनंतर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेत आणुन सीईओच्या दालनासमोर शाळा भरविण्यात आली. तातडीने बदली रद्द करावी अन्यथा पालकांनी अमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. निवेदनावर पालकांच्या स्वाक्षर्या आहेत.























































