दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी औसा तहसीलवर मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। औसा

महाराष्ट्र अपंग कामगार कल्याणकारी संघटनेच्या वतीने दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठी औसा तहसीलवर सोमवारी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो दिव्यांग बांधव या मोर्चात सहभागी झाले होते. शहरातील किल्ला मैदान ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चास सुरूवात झाली होती.

यात औसा शहरासह तालुक्यातून शेकडो दिव्यांगानी या मोर्चात सहभाग नोंदवला. यावेळी दिव्यांगानी आपल्या न्याय हक्कासाठीच्या विविध प्रकारच्या दहा मागण्या मागितल्या. त्यात तालुक्यातील दिव्यांग बांधवाना मानधन वेळेवर मिळत नाही आणि मिळणारे मानधन हे अत्यंत कमी असल्याने किमान तीन हजार रुपये करण्यात यावे, नगर परिषदच्या उत्पन्नातील व ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातील ३ टक्के मिळत नाही तो दिव्यांग व्यक्तीच्या खात्यावर जमा करण्यात यावा, महामंडळाकडून मिळणाऱ्या कर्जास उत्पन्नाची व वयाची अट रद्द करुन बगैर जामिनदाराचे कर्ज मिळावे.

दिव्यांगास अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड देऊन त्वरीत अन्नधान्य वितरीत करण्यात यावे, शासकीय कार्यालयात ये-जा करण्यास त्रास होत आहे. त्वरीत रॅम्प व लिफ्ट ची व्यवस्था करण्यात यावी, दिव्यांग व्यक्ती घरकूल योजनेमध्ये असलेली जातीची अट रद्द करावी, दिव्यांगाच्या नावावर असलेल्या मालमत्तेवर मालमत्ता करास पाणी पट्टी कर व विजबिलात ७५ टक्के सवलत देण्यात यावी, दिव्यांगाच्या ३ टक्के आरक्षित निधीतून दिव्यांगासाठी जीवनावश्यक वस्तू भांडारे उभा करुन दिव्यांगास सवलतीच्या दरात वस्तू खरेदी करण्यास सवलत द्यावी, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी शासकीय मालकीचे व्यापारी गाळे ३ टक्के आरक्षीत करुन वितरीत करण्यात यावे, दिव्यागांच्या पाल्यास शिक्षअपंग दिव्यांग बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

summary…protest for divangya in latur