दुष्काळप्रश्नी तेलगाव येथे राष्ट्रवादीचे रस्ता रोको

30

सामना प्रतिनिधी । माजलगाव

माजलगाव मतदारसंघातील तेलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शुक्रवारी माजीमंत्री प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळप्रश्नी  प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. सोळंके यांनी गुरुवारी आपले विरोधक मोहन जगताप यांच्यावरील टीकेनंतर आज दुसरे विरोधक आमदार आर टी देशमुख यांच्यावर तोंडसुख घेतले. अकार्यक्षम आमदार माजलगाव मतदार संघाला लागल्याने मतदार संघाची वाट लागली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री प्रकाश सोळंके यांनी रस्ता रोको आंदोलनात केले. या आंदोलनामुळे तब्बल एक तास वाहतूक खोळंबली होती.

दुष्काळप्रश्नी रस्ता रोको प्रसंगी बोलताना माजीमंत्री सोळंके यांनी आमदार आर टी देशमुख यांचेवर निशाणा साधला , मतदार संघ दुष्काळात होरपळत आहे. परंतु, आपले आमदार जनतेचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरलेले आहे. आज मतदारसंघात पाण्याची व चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. परंतु आमदार म्हणून देशमुख यांनी कुठली प्रशासकीय पातळीवर उपाययोजना करण्याचे औचित्य दाखवले नाही. जनता पाण्यावाचुन तडफडत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न आहे.तरी देखील दुष्काळ निवारण करण्याची साधी बैठक ही आमदारानी लोकप्रतिनिधी म्हणून घेतली नसल्याचे त्यांनी म्हटले.

या रास्ता रोको आंदोलनाला सभापती अशोक डक, जयसिंग सोळंके,उपसभापती डॉ वसीम मनसबदार, जि. प.सदस्य चंद्रकांत शेजुळ, प्रा प्रकाश गवते,कल्याण आबुज, यांचेसह  शेतकरी बांधव रस्त्यावर उतरले  होते. दरम्यान या रास्तारोको आंदोलनामुळे मोट्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

आपली प्रतिक्रिया द्या