
लॉस एंजेलिस येथे बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या निदर्शनांना हिंसक वळण लागले. हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार आज सकाळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि फटाके पेटवून फेकले. तसेच सुरक्षा दलांवर आणि इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्सफोर्समेंटवर अश्रुधूर आणि पेट्रोल बॉम्ब फेकले. हातात मेक्सिकन ध्वज धरून आयसीई गो आऊट ऑफ लॉस एंजेलोस अशा घोषणाही दिल्या.
हिंसाचारानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल 2 हजार नॅशनल गार्डस् पाठवले असून 6 आणि 7 जून रोजी सरकारने लॉस एंजेलोसमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात मोहीम सुरू केली. त्याचाच निषेध म्हणून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. एक हार आंदोलकांनी इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्पफोर्समेंटच्या इमारतीला वेढा घातला आणि अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याचा दावा करण्यात आला आहे.
बारा देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी
डोनाल्ड ट्रम्प सरकारने तब्बल बारा देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. प्रवेश बंदी असलेल्या देशांमध्ये अफगाणिस्तान, म्यानमार, चाड, काँगो, इक्वेटोरियल गिनी, एरिट्रिया, हैती, इराण, लिबिया, सोमालिया, सुदान आणि येमेन या देशांचा समावेश आहे, बुरूंडी, क्युबा, लाओस, सिएस, लिओन, टोंगो, तुर्कमेनिस्तान आणि व्हेनेझुएला या सात देशांवरली अंशतः बंदी घालण्यात आली आहे.