
मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढलेल्या शिवसेनेच्या उमेदवार रोशनी कोरे-गायकवाड यांनी त्यांचा झालेल्या पराभवाविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. मतमोजणी केंद्रावर गडबड झाल्याचा गायकवाड यांचा आरोप असून त्याकरिता त्या केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज कोणतीही गडबड न करता मिळावे अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.
प्रभाग क्रमांक 3 ची मतमोजणी सुरू असताना त्या प्रक्रियेत मनमानी व भोंगळ कारभार झाला होता. गडबड करीत माझा विजय ढापल्याचे गायकवाड यांचा आरोप आहे. हा झोल उघडकीस आणण्यासाठी गायकवाड यांनी मतदान केंद्रावर लावलेल्या सीसीटीव्ही पॅमेऱ्याचे फुटेज कुठलीही छेडछाड न करता देण्याची मागणी केली आहे. तसे लेखी निवेदन त्यांनी दहिसर पोलीस व उपायुक्तांना दिले आहे.




























































