पीएफच्या यूएएनसाठी कर्मचारी करू शकणार ऑनलाईन अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील संघटित क्षेत्रातील कर्मचाऱयांना आता आपल्या भविष्य निर्वाह निधी खात्याचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन ) स्वतःच ईपीएफओच्या पोर्टलवर जाऊन मिळू शकणार आहे. त्यासाठी त्याला त्याच्या कंपनीकडे अथवा कार्यालयाकडे हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. कर्मचाऱयांना स्वतःच ईपीएफओच्या पोर्टलवर गेल्यावर स्वतःचा यूएएन क्रमांक मिळवून आपल्या खात्यातून व्यवहार करणे शक्य होणार आहे. तशी परवानगीच भविष्य निर्वाह निधी संघटनेने दिली आहे. याशिवाय निवृत्ती वेतनधारक ईपीएफओच्या डिजिलॉकरवर जाऊन आपल्याला आवश्यक ती कागदपत्रे डाऊनलोड करू शकणार आहेत. याशिवाय कर्मचाऱयाने आपली नोकरी बदलल्यास त्याच्या पूर्वीच्या पीएफ खात्यातील जमा ईपीएफओ पोर्टलवर जाऊन ऑनलाइन निवेदन करून हस्तांतरित करू शकणार आहे.