
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे सांगली जिह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव येथे त्यांच्या जन्मभूमीत राष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी शासनाने 25 कोटी रुपये निधीची तरतूद केली आहे. या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसांत ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या मालकीतील 1 हेक्टर 35 आर क्षेत्रफळाची जागा अण्णा भाऊ साठे स्मारकासाठी देण्यात येणार आहे. स्मारक उभारणीमुळे अण्णा भाऊ साठे यांचे कार्य
पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार आहे.