
पाकिस्तान सुपर लीग (PSL 2026) सुरू होऊन अवघे काही दिवस झाले असतानाच एका मोठ्या वादाने या लीगला घेरले आहे. लाहौर कलंदर्स आणि कराची किंग्स यांच्यातील सहाव्या सामन्यात बॉल टॅम्परिंगचा प्रकार समोर आला आहे. गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात लाहौर कलंदर्सच्या फखर जमानला चेंडूशी छेडछाड करताना कॅमेऱ्यात टिपण्यात आले. या लाजिरवाण्या प्रकारामुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा एकदा जागतिक स्तरावर टीकेचे धनी ठरले आहे.
ही घटना सामन्याच्या शेवटच्या षटकापूर्वी घडली, जेव्हा लाहौर कलंदर्सला विजयासाठी 13 धावांचा बचाव करायचा होता. गोलंदाज हारिस रउफ षटक टाकण्यासाठी येण्यापूर्वी कर्णधार शाहीन शाह आफ्रिदी आणि फखर जमान त्याच्याशी चर्चा करत होते. वरवर पाहता ही रणनीती आखली जात असल्याचे वाटत होते, मात्र त्याच वेळी फखर चेंडू खराब करण्याचा प्रयत्न करत होता. मैदानी पंचांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने लाहौर कलंदर्स संघावर 5 धावांची पेनल्टी लावली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहत्यांनी खेळाडूंच्या खिलाडूवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
🚨 BIGGEST HUMILIATION FOR PSL AND PAKISTANI FANS 🚨
Fakhar Zaman and Shaheen Shah Afridi did the ball tampering on live camera & got penalized by 5 runs
PSL is a league where the ball gets pink and now the ball gets tempered on live cam 😆#MIvsKKR pic.twitter.com/U9MtHxmLOz
— Ajay Jadeja (@AjayJadeja171) March 29, 2026
सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू रमीज राजा यांनी या प्रकरणाबाबत विचारले असता, कर्णधार शाहीन आफ्रिदीने हात झटकण्याचा प्रयत्न केला. “नेमकं काय झालं मला माहित नाही, जर हे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालं असेल तर आम्ही त्यावर बोलू,” असे मोघम उत्तर त्याने दिले. मात्र, केवळ 5 धावांच्या दंडावर हा वाद शमण्याची शक्यता कमी आहे. फखर जमान, शाहीन आफ्रिदी आणि हारिस रउफ यांच्यावर पीसीबी (PCB) कडून मोठी कारवाई केली जाऊ शकते, असे संकेत मिळत आहेत.


























































