तब्बल एक तपानंतर मनोरुग्ण महिला पोहचली घरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । निलंगा

तालुक्यातील केळगाव येथील फर्जाना डाळीबंकर या मानसिक रुग्ण असलेल्या विवाहित महिलेने 12 वर्षापुर्वी घर सोडले. तेव्हा भटकत भटकत केरळला पोहचली. तेथील करुणालय ट्रस्टने तिच्यावर उपचार करुन तिला घरी पोहचवले. 12 वर्षानंतर फर्जाना घरी आल्याने तिचे आई – वडिल, भाऊ यांना आनंदाश्रू रोखता आले नाही.

केळगाव (ता.निलंगा) येथील 25 वर्षीय विवाहित फर्जाना राजेसाब डाळीबंकर नावाची महिला मानसिक रुग्ण असल्याने तिने आपले पती, मुलबाळ घर सोडले. सुरुवातीला ती पंजाबला गेली परंतु सुदैवाने ती घरी परत आली. यानंतर 12 वर्षापुर्वी परत घरून निघून गेली तेव्हा घरच्यांनी तिची परतण्याची आशा सोडून दिली होती. परंतु पाच जून रोजी केरळमधुन केळगाव येथील पोलीस पाटील नूर पटेल व निलंगा पोलीस ठाण्याला फर्जानासाठी फोन आला. अधिकृत माहिती प्राप्त झाल्यानंतर अ‍ॅस्परिंग लाईव्हज या एनजीओचे मनिषकुमार यांनी फर्जानाला केरळहून निलंगा येथे आणले. येथील पोलीस ठाण्याच्या पीएसआय प्रियंका आघाव यांनी फर्जानाला मानसिक आधार देऊन तिच्या कुटुंबातील सदस्यांच्या स्वाधीन केले. 12 वर्षानंतर फर्जाना घरी आल्याने तिचे आई – वडिल, भाऊ भेटले. परंतु तिला पती आणि मुले शोधण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.