पाहा व्हिडीओ : ठाण्यात माथेफिरूची दहशत, लहान मुलांना करायचा लक्ष्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । ठाणे

ठाण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक माथेफिरू लहान मूलांना अणुकुचिदार वस्तू टोचत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये ठाण्यातल्या सरस्वती शाळेबाहेर हा माथेफिरु पिरत असल्याचे दिसत आहे. रस्त्यावरून जाणाऱ्या लहान मुलांच्या मागे धावत तो त्यांना टोकदार वस्तू टोचत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. सुरुवातीला तो मुलांना पीन टोचत असेल असं वाटत होतं, मात्र पोलिसांनी त्याच्याकडून पेन जप्त केला आहे. ६ ऑगस्टचा व्हिडीओ आहे. अभिषेक मोरे असं त्याचे नाव असून तो मनोरुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान नौपाडा पोलिसांनी या माथेफिरुला ताब्यात घेतले असून, अभिषेक हा ठाण्यातील नितिन कंपनी परिसरातील श्रीजी व्हीला येथील रहीवासी आहे. लहान मुलांवर दिवसा ढवळ्या हल्ला होत असल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.