
यवतमाळ जिल्ह्यात एका तरुणाने आत्महत्या केली आहे. पब-जीच्या अतिआहारी गेल्याने त्याने ही आत्महत्या केल्याचे कळते आहे. निखिल पिलावण असे या तरुणाचे नाव असून तो बावीस वर्षीय वर्षांचा होता. यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील पिंपरी मुखत्यारपूर या गावात ही घटना घडली आहे.
निखिल हा पुणे येथील एका खासगी कंपनीमध्ये कामावर होता. कोरोनाचा उद्रेक झाल्यामुळे त्याची नोकरी सुटली होती. यामुळे तो आपल्या मूळ गावी परत आला होता. 3 महिने घरी रिकामा बसल्याने त्याला मोबाईलवर पब-जी खेळण्याचा छंद लागला. दिवसेंदिवस त्याचे पबजी खेळण्याचे प्रमाण वाढत गेले आणि छंदाचे रुपांतर व्यसनामध्ये झाले.
निखील दिवसातील सोळा-सोळा तास मोबाइलवर पबजी खेळत असायचा.या गेमच्या आहारी गेलेल्या निखीलने गुरुवारी सकाळी 10 च्या सुमारास घरी कोणी नसताना गळफास लावून आत्महत्या केली. गेम खेळत असताना एक टास्क पूर्ण करण्यासाठी त्याने ही आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात आहे.




























































