Pulwama attack संतप्त शिवसैनिकांनी इम्रान खानच्या प्रतिमेचे केले दहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

जम्मू कश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बीड जिल्हा शिवसेनेकडून ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या घोषणा देत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले.

शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे व सचिन मुळूक यांच्या नेतृत्वाखाली काल बीड येथे शिवसैनिकांनी पुलवामा येथील जवानांवरील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यातील शहीदांना यावेळी शिवसेनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संतप्त शिवसैनिकांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानच्या प्रतिमेचे दहन करत पाकिस्तान मुर्दाबादच्या आसमंत दणाणून सोडणाऱ्या प्रचंड घोषणा दिल्या. यावेळी शिवसेना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, शिवसैनिक, देशप्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थित होती.