पुलवामात धुमश्चक्री; 3 दहशतवादी ठार

224

जम्मू-कश्मीरात सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांत जोरदार चकमक उडाली. सकाळी शोपियामध्ये सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर दहशतवाद्यांनी पुलवामात सीआरपीएफच्या कॅम्पवर ग्रेनेड हल्ला केला. सुदैवाने या हल्ल्यात कुणीही जखमी झाले नाही.

शोपियात लपलेल्या दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याची सूचना सुरक्षा दलाने केली होती. ती धुडकावत दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. त्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी तिघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडले. यात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर वसीम वानीचा समावेश आहे. सुरक्षा दलाने याआधी 12 जानेवारीला पुलवामातील त्रालमध्ये तिघा दहशतवाद्यांना ठार केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या