
पुण्यातील बाणेर येथे एका 15 वर्षीय मुलीवर सहा तरुणांनी सामूहीक बलात्कार केला. त्या सहाही नराधमांना पोलिसांनी अटक केली आहे. चतु:श्रुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
सदर मुलीला अनिल जाधव याने व त्याच्या मित्रांनी चाकूचा धाक दाखवत तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी तिचे आक्षेपार्ह फोटोही काढले. तसेच याबाबत तक्रार केल्यास तुझे फोटो व्हायरल करू अशी धमकी दिली होती. पीडितेने घडलेला सर्व प्रकार तिच्या कुटुंबियाना सांगितला त्यानंतर त्यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी ओम तिंबोळे, जय तिंबोळे, अनिल जाधव, सुनिल जाधव, किरण जावळे, शुभम अशा सहा जणांना अटक केली.
































































