सहलीला गेलेले तिघे मुळशी धरणात बुडाले, मुलीचा मृतदेह सापडला

24
sunk_drawn_death_dead_pic

सामना ऑनलाईन । पुणे

भारती विद्यापीठात एमबीएचे शिक्षण घेणारे बावीस वर्षीय दोन मुले, एक मुलगी आज सकाळी सात वाजता मुळशी धरणात बुडाल्याचे वृत्त आहे. वळणे येथे ही घटना घडल्यानंतर तात्काळ मदत पथकाला बोलवण्यात आले. बुडालेल्या तिघांपैकी मुलीचा मृतदेह सापडला आहे. अन्य दोन मुलगे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचे नाव संगीता नेगी असे आहे. तर शुभम राज सिन्हा आणि शीव कुमार असे दोघे जण बेपत्ता आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या