धक्कादायक! मोटारीच्या धडकेत दुचाकी पेटल्याने तरुणी ठार

776
प्रातिनिधीक फोटो

मद्यपान करुन इंजिनिअरने भरधाव वेगात मोटार चालवित दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकी पेटून अलिशान हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मद्यपी इंजिनिअर चालकाला चंदन नगर पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना मांगवारी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास खराडी परिसरातील दर्गा रस्त्यावरील सिटी विस्टा सोसायटीसमोर घडली. श्रद्धा मधुकर बांगर असे ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी मनीष बळीराम चौधरी असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धा खराडी परिसरातील एका अलिशान हॉटलेमध्ये काम करीत होती. बुधवारी रात्री बाराच्या सुमारास कामावरुन सुटल्यानंतर ती दुचाकीवरुन नगर रस्त्याने चालली होती. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मनीषने श्रद्धाच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे पडून दुचाकी घसरत गेल्याने पेट्रोल सांडले. त्यामुळे दुचाकीने अचानक पेट घेतला. अपघातत गंभीर जखमी झाल्याने श्रद्ध बेशुद्ध पडली होती. त्यादरम्यान दुचाकीला लागलेल्या आगीचा भडका वाढून भाजल्यामुळे श्रद्धाचा जागीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

दरम्यान, चंदननगर पोलिसांनी मोटार चालक मनीषला ताब्यात घेउन त्याची वैद्यकीय चाचणी केली. वैद्यकीय चाचणीच्या अहवालानुसार मनीषने मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले. चौकशीदरम्यान मनीष एका सॉफ्टवेअर वंâपनीत कामाला असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या