
गुरुवारी अनंत चतुर्दशीची धामधूम मुंबईसह पुण्यातही सुरू होती. बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांनी रस्त्यांवर गर्दी केली होती. ढोलताशाच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या घोषणांची बरसात करण्यात येत होती. या धामधुमीत पुणेकरांनी संवेदनशीलता दाखवत अनेकांची मनं जिंकली आहेत.
गुरुवारी लक्ष्मी रोडवर विसर्जनासाठी गणपतींची रांग लागली होती. गर्दीने खचाखच भरलेल्या रस्त्यावर एकच कल्लोळ उडाला होता. तितक्यात एक रुग्णवाहिका सायरन वाजवत लक्ष्मी रोडवर आली. आता ही रुग्णवाहिका गर्दीत अडकणार असं वाटत होत. मात्र, रुग्णवाहिकेचा आवाज ऐकून इतक्या प्रचंड गर्दीत आणि गोंधळातही पुणेकर अवघ्या काही सेकंदात बाजूला झाले आणि त्यांनी रुग्णवाहिकेसाठी रस्ता मोकळा केला. विसर्जनाच्या गोंधळातही पुणेकरांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेबद्दल त्यांचं कौतुक होताना दिसत आहे.
#WATCH Maharashtra: Devotees give way to ambulance during Ganesh idol immersion procession on Lakshmi Road in Pune. #GaneshVisarjan (12.09.2019) pic.twitter.com/GqxtN1QmzP
— ANI (@ANI) September 13, 2019
या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पुणेकरांच्या या संवेदनशीलतेचं उदाहरण अन्य शहरांनीही घ्यायला हवं असं म्हणत नेटकऱ्यांनी पुणेकरांची प्रशंसा केली आहे.





























































