पुणे- कौटुंबिक वादातून वास्तुविशारद महिलेची आत्महत्या

519

कौटुंबिक वादातून वास्तुविशारद असलेल्या महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पुण्यातील कोथरूडमध्ये घडली. भाग्यश्री अमेय पाटील (वय 30, रा. कोथरूड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री वास्तुविशारद होत्या. त्यांचे पती अमेय संगणक अभियंता आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री आणि अमेयचे तीन वर्षांपुर्वी लग्न झाले होते. बुधवारी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर भाग्यश्रीने घरातील खोलीचा दरवाजा आतून बंद केला. गुरुवारी सकाळी भाग्यश्री यांनी दरवाजा उघडला नाही. अमेय यांनी दरवाजा वाजविला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दरवाजा तोडल्यानंतर भाग्यश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या