
सामना ऑनलाईन । पुणे
पुणे-बंगळुरू महामार्गावरील सुरूर येथील उड्डाणपुलाला भगदाड पडले आहे. रविवारी वाहतुकीचे प्रमाण पाहून भुंईज पोलिसांनी उड्डाणपुलावरील वाहतूक बंद केली आहे. उड्डाणपुलाऐवजी पुणे-सातारा महामार्गालगत असणाऱ्या सर्व्हिस रस्त्याने ही वाहतूक वळवण्यात आली आहे.




























































