
पुणे शहरातील प्रतिष्ठीत पुना क्लबमधील पार्किंगमध्ये चारचाकी वाहन आडवून क्लबच्या संचालक महिलेला धमकावण्यात आल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात भाजपचे प्रवत्ते अली दारूवाला यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिला या पूना क्लबच्या संचालिका आहेत. त्या क्लबमधील स्विमिंग पुलाच्या पार्किंगमधून आपली चारचाकी गाडी बाहेर काढत होत्या. त्याच वेळी दारुवाला हे त्यांच्या दोन साथीदारांसह तेथे आले. त्यांनी फिर्यादीच्या वाहनाच्या मागे आपली गाडी आडवी लावून फिर्यादींची गाडी बाहेर काढण्यास प्रतिबंध केला. एवढेच नाही तर फिर्यादी यांचा गोल्व्हा नामक व्यक्तीशी असलेला पेट्रोल पंपाचा व्यवहार लवकर पूर्ण करण्यासाठी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



























































