
वाढदिवसा दिवशी झालेल्या वादाचा बदला म्हणून टोळक्याने सख्ख्या भावडांवर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 27 डिसेंबरला कर्वेगनरमधील रस्त्यावर घडली. याप्रकरणी वारजे पोलिसांनी दोघांना अटक केली असून, इतर फरार झाले आहेत.
रोहन संतोष धोत्रे (वय 20, रा. कमिन्स कॉलेज) व धीरज शिवनारायण दरक (वय 23, रा. शाहु कॉलनी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अतुल शंकर धोत्रे (वय 22) याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुलचा भाऊ अजय धोत्रे व धीरज दरक याच्यात वाद झाले होते. त्या रागातून धीरज व इतर साथीदारांनी २७ डिसेंबरला रात्री साडे आकराच्या सुमारास अतुल व त्यांचा मित्र महेश कोंडे, भाउ अजयला मारहाण केली. टोळक्याच्या हल्ल्यात अजय गंभीर जखमी झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत तपास करीत आहेत.




























































