
भरधाव आरामदायी बसचालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरूण ठार झाला. हा अपघात 6 फेब्रुवारीला रात्री पावणेदहाच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील जुना जकात नाका खराडीत घडला. याप्रकरणी बसचालकाला अटक करण्यात आले आहे.
निरंजन वसंत जाधव (वय – 30, रा. वाघोली ) असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी बसचालक सिद्धेश्वर हरिभाऊ भराड (वय – 47, रा. अमरापूर, चिखली, बुलढाणा) याला अटक केली आहे. निखील जाधव (वय – 29) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार निरंजन हे 6 फेब्रुवारीला रात्री साडेनउच्या सुमारास खराडी परिसरातून घरी निघाला होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने आरामदायी बसचालक सिद्धेश्वरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे खाली पडून गंभीररित्या जखमी झाल्याने निरंजनचा मृत्यू झाला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. पठाण तपास करीत आहेत.




























































