पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर?

सहा राज्यांतील सात विधानसभा पोटनिवडणुकीच्या तारखेची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे, परंतु या घोषणेत पुणे आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ निवडणुकीचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी होणारी पोटनिवडणूक पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते गिरीश बापट यांच्या निधनाने पुण्याची जागा रिक्त आहे, तर बाळू धानोरकर यांच्या निधनाने चंद्रपूर लोकसभेची जागा रिक्त आहे.