पवारांनी हाती घेतली पुण्याची सूत्रे! सहा कार्डियाक ऍम्ब्युलन्स देणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पुढाकार घेत स्वतःच सूत्रे हाती घेतली आहेत. पुण्यातील बिघडलेल्या स्थितीला नेमके कोणते घटक जबाबदार आहेत? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश येत आहे का यावरून पवार यांनी स्थानिक प्रशासनाला फैलावर घेतले.

जुन्या-नव्या उपायांवर फारशी चर्चा न करता पुण्यात नेमके काय चालले आहे? सध्याच्या परिस्थितीवर कोणाचे नियंत्रण आहे? खरोखरीच परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न होत आहेत का, हे पवार यांनी विचारले. पुणे शहराच्या 52 लाख लोकसंख्येच्या प्रमाणात केवळ तीनच कार्डियाक ऍम्ब्युलन्स उपलब्ध होत्या. त्यातील एक बंद आहे. त्याची दखल घेऊन तातडीने 6 कार्डियाक ऍम्ब्युलन्स देणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले.