सराईत आरोपीची केली कारागृहात रवानगी, खडकी पोलिसांचा संयम आला कामी

शहरातील खडकी परिसरात सर्वसामान्य नागरिकांना त्रास देउन महिलांची छेडछाड काढणाNया सराईताला अखेर खडकी पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. अल्पवयीन असल्यापासून संंबंधित आरोपीने नागरिकांना त्रस्त केले होते. त्याला ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सोडून द्यावे लागत होते. मात्र, वयाची 18 वर्षे पुर्ण होताच एका तरूणाच्या खूनाच्या प्रयत्नात आरोपीला अटक करण्यात आली. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. त्यामुळे खडकी परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. विक्रम देवकुळे (वय 18, रा. खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध 5 गुन्हे दाखल आहेत.

सराईत आरोपी विक्रम देवकुळे विद्यापीठ परिसरातील एका झोपडपट्टीत भाडोत्री राहत होता. अल्पवयीन असल्यामुळे तो मद्यपान करून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देत होता. त्याशिवाय रात्रीच्यावेळी महिलांसह मुलींची छेडछाड करीत होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन असल्यामुळे त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार तत्काळ सोडून द्यावे लागत होते. त्यामुळे खडकी पोलिस सराईत आरोपी विक्रमच्या वयाची 18 वर्षे पुर्ण होण्याची वाट पाहत होते. मागील महिन्यात त्याचे वय पुर्ण झाले. दरम्यान, एका तरूणावर खूनाच्या प्रयत्नात तो फरार झाला होता.

त्यानुसार त्याला ताब्यात घेण्यासाठी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथक कार्यरत होते.फरार झाल्यानंतर तो रात्रीचा बाहेर फिरत होता. त्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार विक्रमला पोलिसांनी ताब्यात घेउन अटक केली. ही कामगिरी खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक शब्बीर पठाण, पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हनुमंत जाधव, गणेश काळे, राजकिरण पवार, उद्धव कलंदर, धवल लोणकर, जहाँगीर पठाण, संदीप गायकवाड, अनिरूद्ध सोनवणे, भगवान हंबर्डे, स्वप्नील घोलप, विलास शेवाळे यांच्या पथकाने केली.

”तरूणाच्या खूनाच्या प्रयत्नात सराईत आरोपीला अटक केल्यानंतर खडकीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अल्पवयीन असल्यापासून संबंधित आरोपीने नागरिकांना मनस्ताप दिला होता. गुन्हेगारांविरूद्ध कडक कारवाईचा बडगा उगारला जात आहे.” – प्रताप गिरी, पोलीस उपनिरीक्षक, तपास पथक, खडकी पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या