
शहरातील स्वारगेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतए एकावर खुनी हल्ला करून फरार झालेल्या सराईताला सात वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. विन्या उर्फ विनायक राजगुरू (वय 35 रा लक्ष्मीनगर कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस शिपाई ज्ञाना बडे व मनोज भोकरे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत होते. खूनाच्या प्रयत्नातील सात वर्षांपासून फरारी असलेला आरोपी गुलटेकडी परिसरात आल्याची माहिती ज्ञाना बडे व मनोज भोकरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून विनायक राजगुरू याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर, पोलीस निराीक्षक सोमनाथ जाधव एपीआय अमोल रसाळ, दीपक जमदाडे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने केली.





























































