पुणे – क्रिकेटच्या वादातून दोन गटात हाणामारी, परस्परविरोधी गुन्हा दाखल

क्रिकेट खेळण्यासाठी टीममध्ये न घेतल्याचा राग आल्यामुळे दोन गटात हाणामारी झाल्याची घटना फुरसुंगीतील चंदवाडी मैदानावर घडली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांन दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपुर्वी फुरसुंगीतील हरपले मैदानावर फिर्यादी बाळू राखपसरे (वय 27) हे भावडांसोबत क्रिकेट खेळत होते. त्यावेळी तेथे आलेल्या टोळक्याला राखपसरे भावडांनी क्रिकेट खेळण्यास घेतले नाही. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने भावडांना बॅटने मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड तपास करीत आहेत.

त्याशिवाय सुरेश चंद (वय 54) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा अक्षय आणि इतर सहकाऱ्यांची राखपसरे यांच्यासोबत वादावादी झाली होती. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने सुरेश चंद आणि समीर गायकवाड यांच्या घराच्या काचा फोडून नुकसान केले.याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या