पुणे – घरात दरोडा टाकल्याप्रकरणी पाच जणांना अटक

crime

घरात शिरून हत्याराच्या धाकाने दरोडा टाकल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. ही घटना 2 मार्चला रात्री नऊच्या सुमारास घडली. रिना उर्फ हिना तायडे (वय.24) रोहन किरण बिवाल (वय.19), विशाल उर्फ टेंग्या विनोद कांबळे (वय.19),आकाश उर्फ आक्कु संजय वाघमारे (वय.22, सर्व रा. महादेव वाडी खडकी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मैनुद्दीन कुरेशी (वय 38,रा. जुना खडकी बाजार) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी मैनुद्दीन आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे असून मागील काही दिवसापासून त्यांच्यात सतत वाद होत आहेत. मंगळवारी रात्री नउच्या सुमारास हिना साथीदारांसोबत मैनुद्दीनने यांच्या घरात घुसून कुटूंबियांना हत्याराचा धाक दाखविला. तिजोरीतील आठ हजारांची रोकड आणि मैनुद्दीन यांच्या आईच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून नेत दरोडा टाकला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक शफिल पठाण तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या