
लष्करात भरतीसाठी लेखी पेपर मिळवून देतो असे सांगून पैसे उकळणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. संबंधितांना राज्यभरात अनेक ठिकाणी तरूणांना गंडा घातला असल्याचे उघडकीस आले आहे.
अली अख्तर आणि महेंद्र सोनवणे अशी अटक केलेल्याची ननावे आहेत. आझाद खान याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश साळुंके (वय 21 , रा. डोंगरसनी, तासगाव ) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पुण्यात होणाऱ्या रिलेशन आर्मी भरती परीक्षेचे पेपर फोडून तिन्ही आरोपींनी संपर्कातील उमेदवारांना पुरवणार असल्याचे सांगितले होते. याची माहिती मिलिटरी इंटेलिजन्सला माहिती मिळाली होती. त्यानुसार इंटेलिजन्सने याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारला दिली. त्यानंतर पोलिसांनी अली अख्तर आणि महेंद्र सोनवणे यांना पकडले. चौकशीत त्यांनी अनेक तरुणांना परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका फोडून देण्याचे सांगत लाखो रुपये घेतल्याची कबुली दिली. त्याशिवाय आरोपींनी अनेक विद्याथ्र्यांची मूळ कागदपत्रे घेऊन फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट चार तपास करीत आहेत.

























































