
मोबाईल चोरी, जबरी चोरीसह वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याला खडकी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 22 मोबाईल, 6 दुचाकी, टॅब असा 8 लाख 50 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. अश्पाक आयुब शेख (वय – 23, रा. आदर्शनगर, भाऊ पाटील रोड, बोपोडी) याला अटक केली आहे. खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल चोरी, मोबाईल स्नॅचिंग, जबरी चोरीसह वाहन चोरीचे गुन्हे वाढले होते.
तपास पथक पोलीस प्रमुख उपनिरीक्षक दिग्विजय चौगले आणि गालिब मुल्ला, सुधाकर राठोड यांना वाहनचोरी करणारा आरोपी वाकडेवाडी बसस्थानकाजवळ आल्याची माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून आरोपी अश्पाक शेख याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 8 लाख 50 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोजकुमार पाटील, पोलीस उपायुक्त हिंमत जाधव, एसीपी विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, अश्विनी कांबळे, आशिष पवार, संदेश निकाळजे, अनिकेत भोसले, प्रताप केदारी, सुधाकर तागड, ऋषिकेश दिघे, दिनेश भोये, शिवराज खेड, अनिल पुंडलीक, प्रवीण गव्हाणे यांनी केली.