रस्त्याने पायी चाललेल्या महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविणे सत्र कायम आहे. दुचाकीस्वार चोरट्यांनी फुरसुंगी आणि कोंढवा बुद्रूक परिसरात महिलांचे मंगळसूत्र हिसकाविल्याच्या घटना 30 नोव्हेंबरला रात्री आठ ते नउच्या सुमारास घडल्या आहेत.
जेवण झाल्यानंतर शतपावली करणार्या महिलेचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांना धक्का दिला. त्यांच्या गळ्यातील 40 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याची घटना 30 नोव्हेंबरला रात्री साडेनउच्या सुमारास फुरसुंगी परिसरात ड्रीम नाईट हॉटेल परिसरात घडली.याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशील डमरे तपास करीत आहेत.
दुसर्या घटनेत दुचाकीस्वार चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील 15 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटनाही 30 नोव्हेंबरला साडेआठच्या सुमारास कोंढवा बुद्रूकमधील शांतीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी 52 वर्षीय महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक विजय वगरे तपास करीत आहेत.
महानगरपालिकेसमोरील पुलावर तरूणाला लुटले
पुणे- महानगरपालिकेसमोरील पुलावर थांबलेल्या तरूणाला धमकावून त्याच्याकडील रोकड आणि मोबाइल असा 14 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 26 नोव्हेंबरला घडली आहे. याप्रकरणी 35 वर्षीय तरूणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फिर्यादी तरूण कामानिमित्त पुलावर थांबले होता. त्यावेळी आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांना धमकावून रोकड आणि मोबाइल असा 10 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मानकर तपास करीत आहेत.