पुणे – पिस्तूल बाळगणाऱ्या सराईताला अटक

बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या सराईताला गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाने अटक केली. अविनाश पुंडलिक तांदळेकर (रा. बालाजीनगर, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडा व वाहनचोरी पथक सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी बिबबेवाडी येथे भगली हॉस्पिटल रोडवर आल्यानंतर कर्मचारी सुमित ताकपेरे यांना सार्वजनिक रोडवर एकजण उभा असून, त्याच्या कंबरेला पिस्तुल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शिल्पा चव्हाण शेख, मेंगे, शिवतरे, ताकपेरे छापा टाकून त्याला पकडले. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे असा 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त बच्चन सिंग, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्र देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण यांच्या पथकाने केली.

आपली प्रतिक्रिया द्या