पुणे – मद्यपीने पोलीस नाईकाच्या डोक्यात मारली वीट

दारूच्या नशेत रस्त्यात गोंधळ घालणाऱ्या तरुणाला समजाविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर मद्यपीने डोक्यात वीट मारून त्यांना जखमी केले आहे. याप्रकरणी केशवन बसवराज कांबळे (वय 25, रा. पांडवनगर) याला अटक केली आहे. पोलीस नाईक महेंद्र करगळ (वय 38) हे जखमी झाले आहेत. त्यांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार हे चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात नेमणूकीस आहेत. त्यांना पांडवनगर पोलीस चौकीत कर्तव्य देण्यात आलेले आहे. कर्तव्यावर असताना चौकीसमोरच कांबळे हा दारू पिउन करून गोंधळ घालत होता. त्यामुळे तक्रारदार महेंद्र त्याला त्याला समजावून सांगत गोंधळ घालू नको, असे सांगितले. याचा राग आल्याने त्याने महेंद्र यांनाच शिवीगाळ केली आणि प्लास्टिकची खुर्ची उचलून अंगावर धावून गेला. त्याला पकडून पोलीस चौकीच्या बाहेर आणले. त्यावेळी त्याने बाजूला पडलेली विट उचलून महेंद्र करगळ यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले.

आपली प्रतिक्रिया द्या