पुण्यात कोयत्याने दहशत पसरविणाऱ्या दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

कसबा पेठ परिसरात कोयते हातात घेउन दशहत पसरविणाऱ्या दोघांना फरासखाना पोलिसांनी अटक केली. संकेत आनंद तारू (वय 19, कसबा पेठ ) आणि केतन संजय चव्हाण (वय 21, मंगळवार पेठ ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

कसबा पेठ परिसरात कोयत्यांचा वापर करून फिरणाऱ्यांची माहिती फरासखाना पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संकेत आणि केतनला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, सयाजी चव्हाण, आकाश वाल्मिकी, रिजवान जिनेडी, सचिन सरपाले, अभिनय चौधरी, मल्लीकार्जुन स्वामी, मोहन दळवी, ऋषीकेश दिघे, राकेश क्षीरसागर, महंमद हनीफ शौकत शेख यांच्या पथकाने केली.